"गुजरातच्या सर्वांगीण विकासाचे मॉडेलचे, ज्याला 'गुजरात मॉडेल' म्हणून ओळखले जाते, इतर राज्यात अनुकरण केले जाते. गुजरात मॉडेल तयार करण्याचे श्रेय या परिषदेला देता येईल. आर्थिक सुधारणा असो, सामाजिक सुधारणा असो, पॅरीसमध्ये सीओपी 21 कराराद्वारे पर्यावरण क्षेत्रात दाखविलेले नेतृत्व असो, किंवा भारताचे जगभरात एक मजबूत आणि प्रभावशाली देश म्हणून उदयाला येणे असो, माननीय पंतप्रधान मोदींनी गेल्या साडेचार वर्षात एक सर्वांगीण नेतृत्व दिले आहे. त्यांच्या ध्येयवादी नेतृत्वाखाली सरकारने घेतलेले हे सर्व पुढाकार अमुलाग्र बदल घडवून आणणारे ठरतील.”