हा अर्थसंकल्प क्लिनिकल रिसर्चसाठी जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत करतो. बायोफार्मा शक्ती (ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांच्या माध्यमातून आरोग्य प्रगतीसाठीची रणनीती) हा उपक्रम, ज्यामध्ये 1,000 हून अधिक मान्यताप्राप्त भारतीय क्लिनिकल ट्रायल साइट्सचे जाळे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे, उच्च-मूल्य सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देईल. तसेच, यामुळे कौशल्य विकास, ज्ञान हस्तांतरण आणि नाविन्यपूर्ण उपचारांची लवकर उपलब्धता होण्यास मदत होईल.