त्यांच्यासमवेत झालेली बैठक अतिशय उत्तम होती. हा माणूस (पीएम मोदी) कमाल आहे. त्यांची ऊर्जा, दृष्टी आपल्याला प्रेरणा देते. आम्ही भारतातील आमची गुंतवणूक आणि त्याचा विस्तार याबद्दल चर्चा केली. आम्ही औद्योगिक जमीन संपादित करत आहोत, आम्ही भारतात विविध क्षेत्रांच्या उत्पादनामध्ये गुंतवणूक करणार आहोत... आम्ही जवळपास 20 वर्षांपासून भारतात आहोत. त्यामुळे, आमचे कामकाज आणि मार्केटबद्दलचे ज्ञान आम्हाला धैर्य आणि आत्मविश्वास देते आणि पंतप्रधान मोदींची धोरणे... तीआमच्यासाठी प्रेरणादायी असून आम्हाला भारतात आणखी काम करणे शक्य होते.