“जेव्हा मी पदक जिंकलं, तेव्हा पंतप्रधान मोदींनी मला फोन केला आणि सुरुवातीचे त्यांचे शब्द माझ्या मातृभाषेतले मराठीतले होते. अशा गोष्टींमुळे खेळाडूचा आत्मविश्वास खूप वाढतो. असं वाटतं की जणू काही आपला संपूर्ण देशच आम्हाला पाठिंबा देतो आहे."
“ऑलिम्पिकसाठी रवाना होण्याआधी, आम्ही पंतप्रधानांना जेव्हा त्यांच्या घरी भेटलो, तेव्हा मी मागच्या रांगेत बसलो होतो. पण तरीही त्यांनी माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं होतं, हे मला माहितही नव्हतं. पॅरिसमध्ये मला पदक मिळाल्यानंतर आमचं जेव्हा फोनवरून बोलणं झालं तेव्हा मी शेवटच्या रांगेत बसलो होतो हे त्यांना आठवत होतं. असं आहे त्यांचं निरीक्षण कौशल्य."