मी सुमारे 20-25 वर्षांपूर्वी हे (सबने तुम्हे पुकारा श्री राम जी भजन) गायलं होतं… पंतप्रधान मोदींनी या गाण्याबद्दल लिहिलं आणि संपूर्ण देश ते ऐकत आहे हे पाहून मी खरोखरच आश्चर्यचकित झालो...मला 22 जानेवारीला अयोध्या भेटीचे निमंत्रण मिळालं आहे. आणि मी माझ्या एका मित्रासोबत अयोध्येला जाणार आहे. मी पंतप्रधान मोदींना भेटलो आहे आणि त्यांच्या काही कार्यक्रमात गाणीही म्हटली आहेत, पण त्यांनी माझ्या गाण्याचे ज्या प्रकारे कौतुक केले त्यामुळे मला खूप आनंद झाला.