देशातील करविषयक क्षेत्रात जीएसटी ही सर्वात मोठी सुधारणा आहे. जीएसटीमुळे विविध वस्तू आणि सेवांवर आकारण्यात येणारे बहू-स्तरीय अप्रत्यक्ष कर रद्द होण्याची आशा आहे आणि देशातील केंद्रीय आणि राज्यस्तरीय शुल्क आणि कर एकत्र करून देशाला राष्ट्रीय बाजारपेठ बनवता येईल. आगामी काळात जीएसटी अत्यावश्यक पारदर्शकता आणि मोठी गुंतवणूक घेऊन येईल, आणि वाढलेल्या कर महसूल आणि गुंतवणुकीमुळे भारताच्या जीडीपी मध्ये काही टक्क्यांची वाढ होईल अशी आपण आशा करूया.