जेमी डिमोन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जेपीमॉर्गन चेस
भारत आज एक नक्कीच उज्वल ठिकाण आहे, ही अतिशयोक्ती नाही. आज तुम्ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहात आणि तुम्ही बदल घडवून आणत आहात . लोकं तिमाही किंवा वार्षिक विकासाची चर्चा करतात त्यात मला रस नाही कारण पुढील २०-३० वर्षात भारताचे भवितव्य काय असेल आणि भारतासाठी काय योग्य असेल या दृष्टीने मी देशाकडे पाहतो.