भारताच्या स्टार्टअप व्यवस्थेची ताकद समोर आणणारा ‘स्टार्टअप भारत’ हा खूप प्रेरणादायी कार्यक्रम असून त्याने भारतीयांची नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची आणि देशात आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता अधोरेखित केली आहे. ही व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा आणि वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न पाहणे सुखद अनुभव आहे. पंतप्रधानांनी आखलेल्या योजनांना गती देणे ही काळाची गरज आहे. मला विश्वास आहे की आजच्या कार्यक्रमामुळे हजारो लोकांना प्रोत्साहन मिळेल, जे उद्योगांना सुरुवात करण्यासाठी आणि आपला ठसा उमटवण्यासाठी सीमारेषेवर आहेत.