सॅफ्रा कॅट्झ, मुख्य कार्यकारी अधिकारी, ओरॅकल
मी जेव्हा पंतप्रधानांचे भाषण ऐकले(ऑक्टोबर मध्ये सिलिकॉन व्हॅली येथे ), तेव्हा मला त्यामध्ये जोश, दूरदृष्टीआणि सुधारणा करण्याची मोठी संधी दिसली आणि त्याचबरोबर ही वस्तुस्थिती की तंत्रज्ञानामुळे भारत अधिक समृद्ध होणार आहे, विशेषतः हे जग अधिक समृद्ध होणार आहे. मला माहित होते कि मला पंतप्रधानांना भेटायला,त्यांच्याशी बोलायला आणि संपूर्ण व्यवस्थेत स्वतःला समरसून घेण्यासाठी भारतात यावे लागेल... मी खूप प्रभावित झाले आहे.अशी सखोल आणि व्यापक दूरदृष्टी आणि सुशिक्षित लोकांचा असा सामर्थ्यवान बौद्धिक आधार या दोन्ही गोष्टी अन्यत्र तुम्हाला कुठे पाहायला मिळतील का?