पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात, भारताकडे एक उदयोन्मुख आर्थिक शक्ती म्हणून पाहिले जात आहे जिला अद्याप आपली संपूर्ण क्षमता साध्य करायची आहे. सुमारे २ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेवर जगाचे बारीक लक्ष आहे.... पंतप्रधानांनी भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित अनेक उपक्रम देखील सुरु केले आहेत. लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात, नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण-शहरी दरी सांधण्यासाठी तंत्रज्ञानाच्या महत्वावर भर दिला होता.... संपर्क सुविधा आणि देशभरात सहा लाख किलोमीटरचे "ब्रॉडबँड महामार्ग" निर्माण करण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. मोदींच्या आवडत्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या डिजिटल भारताचा उद्देश सर्व ग्रामपंचायतींमध्ये महत्वपूर्ण वापरासाठी अति वेगवान इंटरनेट सुविधा तसेच प्रत्येक नागरिकाला डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.... स्टार्ट-अप भारत हा सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असून त्याअंतर्गत देशभरात स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.... पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 'स्टार्ट-अप भारत स्टॅन्ड-अप भारत' उपक्रमाद्वारे स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होत असल्यामुळे अर्थव्यवस्था आणि परिसंस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो.