ভারতকী প্রধানমন্ত্রী
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय ) च्या परिचालन श्रेणीच्या विशिष्ट कर्मचाऱ्यांना तसेच विमान वाहतूक नियंत्रक, संचार अधिकारी आणि पायलट यांना सार्वजनिक उपक्रम विभाग डीपीई द्वारा निर्धारित 50 टक्के (दुरुस्ती -पूर्व) मर्यादेव्यतिरिक्त दिल्या जात असलेल्या काही विशेष भत्त्यांच्या नियमितीकरणाला मंजुरी दिली आहे. यामध्ये रेटिंग, तणाव, प्राविण्य , उड्डाण आणि प्रशिक्षक भत्ता यांचा समावेश आहे. तसेच हे भत्ते 35 टक्के (सुधारित ) मर्यादेच्या बाहेर ठेवायला मंजुरी दिली आहे. त्यांना आपल्या कामादरम्यान अनेक प्रकारची कठीण कामे पूर्ण करायची असतात, आणि यासाठी व्यापक ज्ञान आणि विशिष्ट कौशल्यासह माहितीचे संकलन, तार्किक ज्ञान, निर्णय क्षमता यांचा व्यावहारिक उपयोग करणे आवश्यक असते.
हवाई वाहतुकीत अनेक पटीने वाढ , आणि सुरक्षित विमान वाहतूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोत्तम प्रतिभावान कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे आणि सध्याचा कर्मचारीवर्ग कायम ठेवणे या मागचा उद्देश आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar