Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

खाद्यतेले, खाद्य तेलबिया आणि डाळींसंदर्भातील केंद्रीय आदेशांची वैधता वाढवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खाद्यतेले आणि खाद्य तेलबियांसंदर्भातील सध्याच्या 28.9.2015च्या केंद्रीय आदेशाची वैधता वाढवायला आणि डाळींसंदर्भातील 18-10.2015चा केंद्रीय आदेश 1.10.2016 पासून 30.9.2017पर्यंत एक वर्षाने वाढवायला मंजुरी दिली.

डाळी, तेलबिया, खाद्यतेले यासंदर्भात साठवणुकीची मर्यादा ठरवण्यासाठी / आवश्यक परवान्यांसाठी केंद्र सरकारच्या बरोबरीने नियंत्रण आदेश राज्य सरकारांना देता यावेत, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. साठेबाजी रोखण्यासाठी तसेच वंचित घटकांना या वस्तू उपलब्ध करुन देण्यासाठी यामुळे मदत होईल.

B.Gokhale/S.Kane/D. Rane