Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हाथरस दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांना शोक, पीडितांसाठी मदतीची केली घोषणा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मध्ये हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवित हानी बद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक मृत आणि जखमी व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून (PMNRF) दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये, आणि चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

“पंतप्रधान @narendramodi यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून  हाथरस येथील दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये मदत जाहीर केली  आहे. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत दिली जाईल.”

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai