Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गीर आणि आशियाई सिंह या विषयावर परिमल नाथवानी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा पंतप्रधानांतर्फे स्वीकार


राज्यसभा सदस्य परिमल नाथवानी यांच्या गीर आणि आशियाई सिंह या विषयावर आधारित “कॉल ऑफ द गीर” हे कॉफी टेबल बुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन परिमल नाथवानी यांनी हे पुस्तक पंतप्रधानांना दिले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
परिमल भाईतुमची भेट झाल्यामुळे आणि गीर वर आधारलेल्या तुमच्या लेखनकार्याची प्रत मिळाल्यामुळे आनंदित झालो आहे. मी नेहमीच तुम्हांला वन्यजीवनाची उत्कट आवड असलेली व्यक्ती म्हणून ओळखत आलो आहे आणि तुमची ही साहित्य निर्मिती राजेशाही थाट असलेल्या गीरच्या सिहांबद्दल रुची असलेल्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. @mpparimal” 

***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai