Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील बनासकांठा येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या बनासकांठा येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरून X पोस्टमध्ये म्हटले आहे:

“गुजरातमधील बनासकांठा येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल संवेदना. जखमी लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे.

प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2लाख रुपये मदत देण्यात येईल. जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील: पंतप्रधान @narendramodi”

* * *

S.Kane/N.Mathure/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai