पीएम्इंडिया
ब्राझीलचे राष्ट्रपती, महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान – “द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस” प्रदान केला.
हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान केल्याबद्दल ब्राझीलचे राष्ट्रपती,सरकार आणि ब्राझीलच्या जनतेचे पंतप्रधानांनी मनापासून आभार मानले. हा सन्मान भारताच्या 140 कोटी जनतेला आणि भारत आणि ब्राझीलमधील मैत्रीच्या शाश्वत बंधांना आदरांजली आहे,असे हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी नमूद केले. राष्ट्रपती लूला हे भारत-ब्राझील धोरणात्मक सहकार्याचे शिल्पकार आहेत आणि हा पुरस्कार म्हणजे या द्विपक्षीय संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचाही सन्मान आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
हा पुरस्कार दोन्ही देशांच्या लोकांना त्यांचे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणा देईल,अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली.
***
JPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
PM @narendramodi has been conferred with 'The Grand Collar of the National Order of the Southern Cross,' Brazil's highest honour. It was presented to him by President @LulaOficial. pic.twitter.com/Su19yXhMSz
— PMO India (@PMOIndia) July 8, 2025
I’m honoured to have been conferred ‘The Grand Collar of the National Order of the Southern Cross.’ Gratitude to President Lula, the Government and the people of Brazil. This illustrates the strong affection the people of Brazil have for the people of India. May our friendship… pic.twitter.com/MpKS9FgsES
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2025
Sinto-me honrado por ter recebido o Grande Colar da Ordem Nacional do Cruzeiro do Sul. Gratidão ao Presidente Lula, ao Governo e ao povo brasileiro. Isso ilustra o profundo afeto que o povo brasileiro tem pelo povo indiano. Que nossa amizade alcance os ápices do sucesso nos… pic.twitter.com/WL8iaKvFGF
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2025