Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तंत्रज्ञान हा भारताचा सर्वात मोठा समतोल साधणारा घटक आहे हे दाखवून देणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2025

 

रस्त्यावरील सामान्य विक्रेता ते कॉर्पोरेट विश्वात कार्यरत अधिकारी अशा प्रत्येकाला सक्षम करत तंत्रज्ञान  कशा प्रकारे भारताचा सर्वात मोठा समतोल साधणारा घटक ठरला आहे हे दाखवून देणारा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला. “इंडिया स्टॅक, युपीआय, जेएएम त्रिसूत्री , कोविन,  नवोन्मेष तसेच समावेशन यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे, प्रशासनात सुधारणा झाली आहे आणि जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका अधिक बळकट झाली आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात मोदी म्हणतात:

“केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw लिहितात की, रस्त्यावरील सामान्य विक्रेता ते कॉर्पोरेट विश्वात कार्यरत अधिकारी अशा प्रत्येकाला सक्षम करत तंत्रज्ञान हा भारताचा सर्वात मोठा समतोल साधणारा घटक ठरला आहे. इंडिया स्टॅक, युपीआय, जेएएम त्रिसूत्री  आणि कोविन , नवोन्मेष तसेच समावेशन यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे, प्रशासनात सुधारणा झाली आहे आणि जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका अधिक बळकट झाली आहे.”

 

* * *

सुषमा काणे/संजना चिटणी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai