Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2025

 

रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीत दोन्ही नेत्यांनी कृषी, खते, अन्न प्रक्रिया आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धींगत करण्याच्या मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण केली.

यावेळी पंतप्रधानांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याप्रति सदिच्छा व्यक्त केली, तसेच  आगामी 23 व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने पुतीन यांचे भारतात स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याची भावनाही व्यक्त केली.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai