Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर  2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची यांचे हार्दिक अभिनंदन केले. X या समाजमाध्यमावरच्या संदेशात, पंतप्रधान मोदींनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

मोदींनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:

“जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची, आपले हार्दिक अभिनंदन. भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आपल्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.आपले दृढ होत असलेले संबंध हिंद-प्रशांत आणि त्यापलीकडे शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे आहेत.@takaichi_sanae”

 

निलीमा चितळे/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com