Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित समारंभात सहभागी होणार


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या समारंभात सहभागी होणार आहेत. राज्य घटना स्वीकारली त्याला यंदा 76 वर्षे पूर्ण होत आहेत.

भारताच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.

या कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येईल. त्यानंतर, भारतीय राज्यघटनेच्या मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मिरी, तेलगू, ओडिया आणि आसामी या नऊ भाषांमधील अनुवादित आवृत्त्यांचे प्रकाशन करण्यात येईल. याच कार्यक्रमात “भारत के संविधान में कला और कैलीग्राफी” या विषयावरील स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात येणार आहे..

 

आशिष सांगळे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai