Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अरुणाचल प्रदेश मधील अंजाव जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख


नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025

अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात आज झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. आपल्या जिवलगांना गमावलेल्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो.

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये दिले जातील.तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत केली जाईल.

 

सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai