Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पटना पक्षी अभयारण्य आणि छरी-धांड येथे नवीन रामसर स्थळांचे पंतप्रधानांनी केले स्वागत


नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एटा (उत्तर प्रदेश) येथील पटना पक्षी अभयारण्य आणि कच्छ (गुजरात) येथील छारी-धंद यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचे स्वागत केले आहे. स्थानिक लोकसंख्या आणि पाणथळ जागांच्या संवर्धनाबद्दल आस्था असलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले की, या मान्यतांमुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि महत्त्वपूर्ण परिसंस्थांचे जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी होते.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट केले:

“एटा (उत्तर प्रदेश) येथील पटना पक्षी अभयारण्य आणि कच्छ (गुजरात) येथील छरी-धंद यांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाल्याने आनंद झाला. तेथील स्थानिक लोकांना, तसेच पाणथळ जागांच्या संवर्धनाची आवड असलेल्या सर्वांचे अभिनंदन. ही मान्यता जैवविविधतेचे संरक्षण आणि महत्त्वाच्या परिसंस्थांचे रक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करते. ही पाणथळ जागा असंख्य स्थलांतरित आणि स्थानिक प्रजातींसाठी सुरक्षित अधिवास म्हणून सतत समृद्ध राहोत.”

* * *

नितीन फुल्लुके/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai