Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी केले इस्रायली संसद ‘नेसेट’ ला संबोधित

पंतप्रधानांनी केले इस्रायली संसद ‘नेसेट’ ला संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेमध्ये इस्रायली संसद ‘नेसेट’च्या एका विशेष अधिवेशनाला संबोधित केले. इस्रायली संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

‘नेसेट’मध्ये आगमन झाल्यावर, नेसेटचे अध्यक्ष महामहीम अमीर ओहाना यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान देण्यात आला. पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान महामहीम बेंजामिन नेतन्याहू, विरोधी पक्षनेते महामहीम यायर लॅपिड आणि अध्यक्ष ओहाना यांनी अधिवेशनात आपले विचार व्यक्त केले आणि भारत-इस्रायल संबंधांना भक्कम द्विपक्षीय पाठिंबा दर्शवला.

या विशेष सन्मानाबद्दल अध्यक्षांचे आभार मानून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. भारत आणि इस्रायलमधील मैत्रीचे दृढ बंध अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, दोन्ही देशांमध्ये प्राचीन सभ्यताकालीन संबंध आहेत आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक अभिसरण यावर आधारित एक मजबूत समकालीन भागीदारी आहे. त्यांनी नमूद केले की शेती, ग्रामीण विकास, पाणी व्यवस्थापन, शाश्वतता आणि उद्योजकता या क्षेत्रांतील सहकार्यावर आधारित चैतन्याने भरलेल्या दोन्ही देशातील जनतेच्या परस्परसंबंधांनी या नात्याला एक गतिशील दृष्टिकोन दिला आहे. दोन्ही देशांतील ऐतिहासिक संबंध आणि लोकांच्या येण्या-जाण्याच्या प्रवासावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, इस्रायलमधील भारतीय समुदाय आणि भारतातील ज्यू समुदायाने दोन्ही देशांच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे.

दहशतवादाबाबत दोन्ही देशांच्या शून्य सहनशीलतेच्या तडजोड न करणाऱ्या धोरणाची आठवण करून देत, पंतप्रधानांनी 7 ऑक्टोबर च्या दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आणि अशा क्रूरतेचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही, असे नमूद केले. या प्रदेशात शाश्वत शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व प्रयत्नांना त्यांनी भारताचा पाठिंबा दर्शवला.

या संदर्भात, त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मान्यता दिलेल्या गाझा शांतता उपक्रमाला भारताचा ठाम पाठिंबा असल्याचे अधोरेखित केले. बहुपक्षीय क्षेत्रात भारत आणि इस्रायल यांच्यामधील सुरू असलेल्या सहकार्याची नोंद घेत, त्यांनी भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक प्रदेश [IMEC] आणि I2U2 चौकटींमध्ये उभय देशांना सविस्तर संवाद करण्याचे आवाहन केले.

भारताच्या विकासाच्या गाथेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा विकास, हरित वाढ, स्टार्ट-अप्स, डिजिटल सोल्यूशन्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उभय देशांतील अधिक द्विपक्षीय सहकार्याची अपेक्षा केली, ज्यामुळे तरुणांच्या नवोन्मेष आणि सर्जनशीलतेला चालना मिळेल. द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या समाप्तीबद्दल समाधान व्यक्त करताना, त्यांनी अद्याप सर्वतोपरी न उपयोगात आणलेल्या व्यापार क्षमता साकार करण्यासाठी लवकरात लवकर महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याचे आवाहन केले.

भारतात इस्रायलसाठी अलिकडेच स्थापन झालेल्या संसदीय मैत्री गटाचा लाभ घेऊन दोन्ही लोकशाहींमधील संसदीय संवाद अधिक वाढावा अशी आकांक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.भारताचे वसुधैव कुटुंबकम [संपूर्ण जग एक कुटुंब आहे] हे तत्वज्ञान आणि तिक्कुम ओलम [जगाला बरे करणारे] इस्रायली तत्व हे एका सुसंवादी समाजासाठी सामायिक दृष्टिकोन दर्शवते; असे दोन्ही संस्कृतींच्या नीतितत्वांतील समांतरता अधोरेखित करत, पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधानांनी भारत-इस्रायल संबंधांमध्ये योगदान दिल्याबद्दल नेसेटच्या सदस्यांचे आभार मानले आणि आगामी पुरीमच्या सणासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या भाषणानंतर, पंतप्रधानांना नेसेटचे सभापती महामहिम आमिर ओहाना यांनी *मेडल ऑफ नेसेट*हे पदक” प्रदान करुन त्यांचा सत्कार केला.पंतप्रधानांनी हा सन्मान भारत आणि इस्रायलमधील चिरस्थायी मैत्रीला समर्पित केला आहे. 

पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण पुढील लिंकवर पाहता येईल [लिंक]

***

NehaKulkarni / ShaileshPatil / SampadaPatgaonkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai