Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी संवाद साधला


नवी दिल्‍ली, 1 मार्च 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करुन या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण प्रसंगी भारत संयुक्त अरब अमिरातीच्या पाठीशी एकजुटीने उभा असल्याचे त्यांनी सांगितले.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये रहात असलेल्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचे आभार मानले. या क्षेत्रात प्रादेशिक शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य प्रस्थापित करुन तणाव कमी करण्यासाठी भारताचा निरंतर पाठिंबा असेल यावर पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष, माझे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला तसेच या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण प्रसंगी भारत संयुक्त अरब अमिरातीच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये रहात असलेल्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आम्ही तणाव कमी करणे, प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याला पाठिंबा देतो.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai