Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 19 मार्च 2026

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी त्यांनी समृद्धी, आरोग्य व ‘विकसित भारत’चा संकल्प पूर्ण व्हावा, अशी प्रार्थना केली.

नवरात्रीच्या पवित्र उत्सवाचा प्रारंभ होत असताना, पंतप्रधानांनी देवी शैलपुत्रीच्या दिव्य आणि परोपकारी कृपेचे महत्त्व सांगणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. पंतप्रधान मोदींनी या प्रसंगी देवीला समर्पित एक भक्तीपर स्तोत्रदेखील सामायिक केले आणि नमूद केले की, देवीच्या असीम कृपेने सर्व नागरिकांचे कल्याण होईल व विकसित भारताच्या सामूहिक संकल्पाला एक मोठी गती मिळेल.

पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या पोस्ट्सच्या एका मालिकेमध्ये लिहिले:

“देशभरातील माझ्या सर्व कुटुंबियांना नवरात्रीच्या हार्दिक मंगलकामना. शक्तीच्या उपासनेचा हा दिव्य प्रसंग तुम्हा सर्वांसाठी सुख, सौभाग्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. शक्तिस्वरूपा आई दुर्गेच्या असीम कृपेने सर्वांचे कल्याण होवो, ज्यामुळे विकसित भारताच्या आपल्या संकल्पालाही नवीन ऊर्जा मिळेल. जय अंबे जगदंबे मा! “

“नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई दुर्गेचे पहिले स्वरूप देवी शैलपुत्रीच्या पूजेची परंपरा आहे. त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात संयम, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा, हीच कामना आहे.

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।

वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥”

मी देवी शैलपुत्रीला वंदन करतो, जी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते, जिच्या कपाळावर चंद्रकोर विराजमान आहे, जी बैलावर  आरूढ आहे आणि जिच्या हातात त्रिशूळ आहे. ती एक तेजस्वी आणि वंदनीय देवी आहे.

“जगज्जननी आई दुर्गेच्या चरणी कोटी-कोटी देशवासियांच्या वतीने माझे नमन आणि वंदन! नवरात्रीच्या पावन पर्वावर देवी मातेकडे विनंती आहे की तिने प्रत्येकाला आपल्या स्नेहाचा आणि अनुकंपेचा आशीर्वाद द्यावा. जय माता दी!”

 

 

 

* * *

शिल्पा नीलकंठ/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai