पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 19 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी आगामी उत्सवाबाबत शुभेच्छा देण्यासाठी आणि या प्रदेशातील नव्याने निर्माण झालेल्या स्थितीबाबत फलदायी चर्चा केली.
पंतप्रधानांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी संवाद साधला आणि ओमानच्या जनतेला ईदच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या. या चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी या प्रदेशातील तणाव कमी करण्यासाठी आणि त्यानंतर शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्दी वाटाघाटींना प्राधान्य देण्याच्या गरजेवर सहमती दर्शवली. ओमानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनाचा भारताने निषेध केल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला, तसेच भारतीय नागरिकांसह हजारो लोकांना मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी ओमानने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. भारत आणि ओमान ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तून सुरक्षित आणि मुक्त नाविक परिचालनाचे पुरस्कर्ते आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः
“माझे बंधू सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी फलदायी चर्चा झाली आणि ओमानच्या जनतेला ईदच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या. तणाव कमी करण्यासाठी आणि त्यानंतर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्दी वाटाघाटींना प्राधान्य देण्याच्या गरजेवर आमचे एकमत झाले.
ओमानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन झाल्याबद्दल भारताने आपला निषेध पुन्हा व्यक्त केला आणि भारतीय नागरिकांसह हजारो लोकांना मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी ओमानने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. भारत आणि ओमान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतूनसुरक्षित आणि मुक्त नाविक परिचालनाचा पुरस्कार करत आहेत.”
Had a productive conversation with my brother Sultan Haitham bin Tariq and conveyed advance Eid greetings to the people of Oman.
We agreed on the need to prioritize dialogue and diplomacy for de-escalation and subsequent restoration of peace and stability.
Reiterated India’s…
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2026
* * *
राधिका अघोर/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Had a productive conversation with my brother Sultan Haitham bin Tariq and conveyed advance Eid greetings to the people of Oman.
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2026
We agreed on the need to prioritize dialogue and diplomacy for de-escalation and subsequent restoration of peace and stability.
Reiterated India’s…