Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अनुतिन चार्नवीराकुल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन


नवी दिल्‍ली, 20 मार्च 2026

 

थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अनुतिन चार्नवीराकुल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मनःपूर्वक अभिनंदन केले.

भारत-थायलंडची बहुआयामी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होण्यासाठी थायलंडच्या नव्या नेतृत्वासोबत काम करायला आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि थायलंड यांचे संबंध हे सामायिक सांस्कृतिक वारसा, घनिष्ठ सांस्कृतिक नाते आणि उत्साही लोकांमधील संबंधांवर आधारित आहेत, असे ते म्हणाले. भारत आणि थायलंड हे शांतता, प्रगती आणि समृद्धी या सामायिक ध्येयासाठी एकत्र आहेत असे त्यांनी पुढे नमूद केले.

पंतप्रधानांनी X वर लिहिले: “अनुतिन चार्नवीराकुल यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. भारत-थायलंड या बहुआयामी धोरणात्मक भागीदारीला आम्ही आणखी बळकटी देऊ. आमचे संबंध सामायिक सांस्कृतिक वारसा, दृढ सांस्कृतिक नाते आणि उत्साही लोकांमधील संबंधांवर आधारित आहेत. भारत आणि थायलंड हे शांतता, प्रगती आणि समृद्धी या सामायिक ध्येयासाठी एकत्र आहेत.”

 

* * *

निलिमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai