Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियाचे प्रथम उपपंतप्रधान डेनिस मँतूरोव्ह यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


रशियाचे प्रथम उपपंतप्रधान महामहीम डेनिस मँतूरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

प्रथम उपपंतप्रधान मँतूरोव्ह यांनी, व्यापार आणि आर्थिक भागीदारी, खते, संपर्क जोडणी तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध यांसह परस्पर हिताशी संबंधीत विविध क्षेत्रांमधील सहकार्यपूर्ण भागिदारींच्या प्रगतीबद्दलची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2025 मध्ये 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या निमीत्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताला दिलेल्या यशस्वी भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.

भारत आणि रशियामधील विशेष तसेच विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने वार्षिक शिखर परिषदेतील फलनिष्पत्तीच्या अंमलबजावणीसाठी उभय  देश सातत्याने  करत असलेल्या प्रयत्नांबद्दलही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना शुभेच्छा दिल्या तसेच परस्परांमधील सातत्यपूर्ण संवादासाठी आपण उत्सुक असल्याचेही सांगितले.

***

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]

Goa

Follow us on social media: PM India@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji   PM India /pibpanaji  PM Indiapibgoa@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBPanaji   PM India /pibpanaji