Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या आरोग्य आणि निरामयता प्रणालीमध्ये होमिओपथीच्या अविभाज्य भूमिकेवर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा एक लेख सामायिक केला, ज्यामध्ये होमिओपथी भारताच्या बहुविध आरोग्य आणि निरामयता प्रणालीचा अविभाज्य भाग कशी बनली आहे, याचे विवेचन करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:

“या लेखामध्ये, केंद्रीय राज्यमंत्री @mpprataprao यांनी होमिओपथी भारताच्या वैविध्यपूर्ण आरोग्य आणि निरामयता प्रणालीचा एक अविभाज्य भाग कसा बनली आहे, हे स्पष्ट केले आहे. होमिओपथीतून आपल्याला एक सर्वसमावेशक आणि रुग्ण-केंद्रित दृष्टीकोन मिळतो.”

समुदायाशी असलेल्या सखोल नात्यासह आणि शाश्वत दृष्टिकोनासह होमिओपथी, विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचा मार्ग दाखवत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

***

निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai