Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हंगेरी मधील निवडणुकीतील यशाबद्दल पीटर मॅग्यार यांचे अभिनंदन केले


नवी दिल्‍ली, 13 एप्रिल 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटर मॅग्यार आणि ‘तिस्झा पक्षा’चे, हंगेरी मधील निवडणुकीत भरघोस यश मिळवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.

भारत आणि हंगेरी हे घनिष्ठ मैत्री, सामायिक मूल्ये आणि परस्परांप्रती असलेल्या निरंतर आदरभावनेने जोडलेले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दोन्ही प्रदेशांमधील लोकांच्या सामायिक समृद्धी आणि क्षेमकल्याणाकरता,  उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारीला चालना देण्यासाठी मॅग्यार यांच्यासोबत जवळून काम करण्यास आपण उत्सुक आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.  

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल पीटर मॅग्यार आणि तिस्झा पक्षाचे हार्दिक अभिनंदन. भारत आणि हंगेरी हे घनिष्ठ मैत्री, सामायिक मूल्ये आणि परस्परांप्रती असलेल्या निरंतर आदरभावनेने जोडलेले आहेत. दोन्ही प्रदेशांमधील लोकांच्या सामायिक समृद्धी आणि क्षेमकल्याणाकरता  उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारीला चालना देण्यासाठी आपण तुमच्या   सोबत काम करण्यास उत्सुक आहे.

@magyarpeterMP”

* * *

नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai