पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. सुमारे साडे अकरा वाजता, पंतप्रधान बालोत्रा येथील पाचपद्रा येथे उभारण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल संकुलाचे लोकार्पण करतील. यावेळी ते एका जाहीरसभेला संबोधित देखील करतील.
हा ऐतिहासिक प्रकल्प भारताची ऊर्जा सुरक्षा आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. हिंदुस्थान पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेल्या या प्रकल्पाअंतर्गत 79,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसह 9 दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष (एमएमटीपीए) क्षमतेचा ग्रीनफिल्ड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल संकुल उभारण्यात आला आहे.
अत्याधुनिक संकुलात 2.4 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष पेट्रोकेमिकल क्षमतेसह रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल उत्पादनाचे एकत्रीकरण केले आहे. या रिफायनरीचा नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स 17.0 असून पेट्रोकेमिकल उत्पादन 26% पेक्षा जास्त आहे, जे कार्यक्षमता आणि शाश्वततेसाठीच्या जागतिक मानकांशी सुसंगत आहे.
भारताची ऊर्जा सुरक्षा, पेट्रोकेमिकल क्षेत्रातील स्वयंपूर्णता आणि उद्योगक्षेत्राला चालना देण्यात हा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. या प्रदेशात पेट्रोकेमिकल आणि प्लॅस्टिक पार्क विकसित करण्यासह, कमकुवत आणि पूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प एक आधारभूत उद्योग म्हणून कार्य करेल. याव्यतिरिक्त या रिफायनरीमुळे या भागात लक्षणीय रोजगार निर्मिती होईल आणि सामाजिक-आर्थिक विकासात देखील योगदान मिळेल.
* * *
नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai