Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक करत राष्ट्रसेवा हाच विकसित भारताचा पाया असल्याचे केले स्पष्ट


नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसेवा हा ‘विकसित भारता’चा पाया असल्याचे अधोरेखित करत या आशयाचे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. लोकसेवा दिनाच्या या गौरवशाली प्रसंगाचे औचित्य साधून, सर्वात मागे असलेल्या व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सक्षम,समृद्ध आणि संवेदनशील भारत घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा आपण पुन्हा एकदा निर्धार करूया, असे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी पुढील संस्कृत सुभाषित सामयिक केले आहे-

“शीलं परहितासक्तिः अनुत्सेकः क्षमा धृतिः।

अलोभश्चेति विद्यायाः परिपाकोञ्चलं फलम्॥”

नम्रता,परोपकार, लीनता, क्षमाशीलता, सहनशीलता आणि निर्लोभीपणा, ही सर्व ज्ञानाच्या परिपूर्णतेची  तेजस्वी फळे आहेत, असे या सुभाषितात सांगितले आहे. 

एक्स समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात:

“राष्ट्रसेवा हा ‘विकसित भारत’ चा पाया आहे. नागरी सेवा दिनाच्या या गौरवशाली प्रसंगी, आपण  रांगेतील सर्वात शेवटच्या व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवात आणून सशक्त, समृद्ध तसेच संवेदनशील भारताच्या उभारणीचा पुनश्च निर्धार करूया. 

शीलं परहितासक्तिः अनुत्सेकः क्षमा धृतिः।

अलोभश्चेति विद्यायाः परिपाकोञ्चलं फलम्॥”

नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai