Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2026

 

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या असून, जखमींची  प्रकृती लवकरात लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे.

 यासोबतच, पंतप्रधानांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मधून मृतांच्या वारसाला  2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

‘X’ या समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणतात,

“उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुर्घटनेतील जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

या दुःखद घटनेत जीव गमावलेल्यांच्या वारसांना पीएमएनआरएफ  मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील: पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

निलिमा चितळे/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai