पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. स्वीडनच्या राजकुमारी क्राउन प्रिन्सेस व्हिक्टोरिया यांनीही या बैठकीत भाग घेतला आणि महामहीम राजे कार्ल सोळावे गुस्ताफ आणि राणी सिल्व्हिया यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी महामहीम राजांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी भारत-स्वीडन संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला आणि व्यापार व गुंतवणूक, नवोन्मेष, हरित संक्रमण, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा, डिजिटलायझेशन, लघु आणि मध्यम उद्योग, अंतराळ, संशोधन, शिक्षण, संस्कृती आणि दोन्ही देशांमधील परस्पर संबंध या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंधांना चालना मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित आणि नवोन्मेष, शाश्वतता व संशोधन आणि विकास या क्षेत्रांमधील परस्पर-संबंधांनी अधिकाधिक वृद्धिंगत होणारे हे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या सामायिक वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. या विस्तारत चाललेल्या भागीदारीला दिशा देण्यासाठी नियमित उच्च-स्तरीय राजकीय सहभाग आणि संस्थात्मक संवाद राखण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
भारत-स्वीडन नातेसंबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. ही धोरणात्मक भागीदारी स्थैर्य आणि सुरक्षेसाठी धोरणात्मक संवाद; पुढील पिढीची आर्थिक भागीदारी; उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह संपर्कव्यवस्था; आणि उद्याच्या भविष्याला एकत्र आकार देणे – लोक, ग्रह, आरोग्य आणि लवचिकता या चार स्तंभांद्वारे मार्गदर्शित असेल. या धोरणात्मक भागीदारीची अंमलबजावणी करण्यासाठी, राजकीय, आर्थिक, तांत्रिक, सुरक्षा, हवामान आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंधांच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी एक व्यापक आराखडा प्रदान करणाऱ्या, ‘भारत-स्वीडन संयुक्त कृती योजना 2026-2030’ (India-Sweden Joint Action Plan 2026-2030) चा दोन्ही नेत्यांनी स्वीकार केला.
अलीकडेच पूर्ण झालेल्या भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराने आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू केला असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले, तसेच व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान जोडणी अधिक दृढ करण्यासाठी या कराराच्या लवकरात लवकर अंमलबजावणीसाठीचे प्रयत्न सुरू ठेवण्यावर त्यांनी सहमती दर्शवली.
पंतप्रधान मोदी यांनी नवोन्मेष, स्वच्छ तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन, शाश्वत गतिशीलता आणि डिजिटल परिवर्तनासह धोरणात्मक क्षेत्रांमध्ये स्वीडनने भारतासोबत सातत्याने ठेवलेल्या संपर्काचे कौतुक केले. स्वीडनचे पंतप्रधान क्रिस्टरसन यांनी डिजिटल परिवर्तन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात भारताने घेतलेल्या गरुडझेपेचे कौतुक केले. स्वीडनची अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष परिसंस्थेमध्ये भारतीय समुदायाच्या सकारात्मक योगदानाचाही त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या विकास प्रवासात स्वीडनला आणखी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हितसंबंधांच्या प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या निकडीवर भर दिला. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात स्वीडनने दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्वीडनचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी शांतता, स्थैर्य, लवचिक पुरवठा साखळी आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
***
NitinFulluke / ShaileshPatil / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
PM @narendramodi held productive discussions with @SwedishPM Ulf Kristersson and HRH Crown Princess Victoria.
— PMO India (@PMOIndia) May 17, 2026
The discussions covered expanding cooperation across defence, innovation, trade, AI and climate action. The two sides also decided to elevate the India-Sweden… pic.twitter.com/JesOX3VkmW
Held wonderful discussions with PM Ulf Kristersson. It was great to have HRH Crown Princess Victoria also join the meeting. She also conveyed the wishes of Their Majesties the King and Queen of Sweden. My gratitude to them.
— Narendra Modi (@narendramodi) May 17, 2026
India-Sweden relations are built on the strong… pic.twitter.com/Z8IsQJxvh6
Hade fantastiska samtal med statsminister Ulf Kristersson. Det var fantastiskt att H.K.H Kronprinsessan Victoria också deltog i mötet. Hon framförde också lyckönskningar från Deras Majestäter Kungen och Drottningen av Sverige. Min tacksamhet till dem.
— Narendra Modi (@narendramodi) May 17, 2026
Relationerna mellan Indien… pic.twitter.com/vSWiYtei2H