पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 18 मे 2026
महामहीम नॉर्वेचे पंतप्रधान,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमांचे सहकारी,
नमस्कार!
नॉर्वेचा दौरा करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा देश निसर्ग आणि मानवी प्रगती यांच्यातील समन्वयाचे एक सुंदर उदाहरण आहे.
सर्वप्रथम मी पंतप्रधान महोदयांचे या आत्मियतापूर्ण स्वागतासाठी मनापासून आभार मानतो आणि उद्या नॉर्वेच्या संविधान दिनाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी, मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या वतीने, नॉर्वेसारख्या भक्कम आणि सचेत लोकशाही देशातील जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.
मी गेल्या वर्षीच नॉर्वेच्या दौऱ्यावर येणार होतो, मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तो दौरा मला स्थगित करावा लागला. त्या कठीण कालखंडात नॉर्वेने दहशतवादाविरोधात भारतासोबत खंबीरपणे उभे राहून खऱ्या मैत्रीची प्रचिती दिली. आज नॉर्वेमध्ये आलेलो असताना, त्या वेळी दाखवलेल्या एकजुटीबाबत मी मनापासून आभार व्यक्त करतो.
मित्रांनो,
आज जग एका अस्थिर आणि अनिश्चिततेच्या कालखंडातून वाटचाल करत आहे. युक्रेन असो किंवा पश्चिम आशिया, जगातील अनेक भागांमध्ये संघर्षाची परिस्थिती कायम आहे. अशा स्थितीत भारत आणि युरोप, आपल्या संबंधांच्या एका नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहेत.
गेल्या वर्षी, भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनने एक ऐतिहासिक व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार लागू केला. हा करार भारत आणि नॉर्वे दरम्यान सामायिक प्रगती आणि समृद्धी सुनिश्चित करणारा आराखडा आहे. या करारामध्ये, पुढील 15 वर्षांत भारतात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 1 दशलक्ष रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. आज आम्हा दोघांनी या कराराच्या आश्वासनांचे फलनिष्पत्तीमध्ये रुपांतर करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
मित्रांनो,
आज आपण भारत-नॉर्वे संबंधांना एका ‘ हरित धोरणात्मक भागीदारी’चे रूप देत आहोत. या धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून, स्वच्छ ऊर्जेपासून ते हवामान प्रतिरोधकता आणि नील अर्थव्यवस्थेपासून ते हरित नौवहनापर्यंत, प्रत्येक क्षेत्रात भारताची व्याप्ती, वेग आणि प्रतिभा यांची नॉर्वेच्या तंत्रज्ञान आणि भांडवलाशी सांगड घालून, आपल्या कंपन्या जागतिक उपाय विकसित करतील.
मित्रांनो,
संशोधन, शिक्षण आणि नवोन्मेष हे देखील आपल्या संबंधांचे मजबूत स्तंभ बनत आहेत. आज आपण शाश्वतता, सागरी ऊर्जा, भूविज्ञान आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे.
अभियांत्रिकी, एआय, सायबर आणि डिजिटल यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपण आपल्या विद्यापीठांना आणि स्टार्ट-अप परिसंस्थेला जोडून आपली भागीदारी भविष्यासाठी सज्ज बनवू कौशल्य विकास आणि परस्परांच्या प्रतिभेचा एकमेकांसाठी वापर यामुळे देखील आपले सहकार्य अधिक व्यापक होणार आहे.
मित्रहो,
नॉर्वे हा आर्क्टिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा देश आहे. आर्क्टिक आणि ध्रुवीय संशोधनात आपले दीर्घकाळापासून सहकार्य राहिले आहे. भारताचे आर्क्टिक संशोधन केंद्र “हिमाद्री” च्या परिचालनासाठी आम्ही नॉर्वेचे आभारी आहोत. इस्रो आणि नॉर्वे स्पेस एजन्सी दरम्यान आज होत असलेला सामंजस्य करार, आपल्या अंतराळ सहकार्याला देखील नवीन आयाम देईल.
या सर्व क्षेत्रांच्या सखोल सहकार्यातून आमच्या संशोधकांनी हवामान बदलाला समजून घेण्यात, नाजूक परिसंस्थेला संरक्षित करण्यात आणि मानवी भविष्याला अधिक सुरक्षित करण्यात सहभाग दिला आहे.
मित्रहो,
भारत आणि नॉर्वे यांच्यातील ही हरित धोरणात्मक भागीदारी संपूर्ण जगाला लाभदायक ठरणार आहे. आम्हाला याचा आनंद होत आहे की, नॉर्वे आज हिंद प्रशांत उपक्रमाशी जोडला गेला आहे.
दोन मोठे सागरी देश असल्याच्या नात्याने आम्ही एकत्र मिळून सागरी अर्थव्यवस्था, सागरी सुरक्षा आणि क्षमता बांधणी मध्ये आमची भागीदारी मजबूत करु. आज आम्ही त्रिकोणी विकास सहकार्य करार केला आहे. आम्ही एकत्र येऊन ग्लोबल साऊथ देशांमध्ये भारताच्या डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांतून मानवी विकासात आमचे योगदान देऊ.
मित्रहो,
भारत आणि नॉर्वे हे दोन्ही देश, नियमाधारित व्यवस्था, संवाद आणि मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवतात. आमचे एकमत आहे की, लष्करी संघर्षामुळे कोणत्याही मुद्द्यावर तोडगा निघत नाही. युक्रेन असो की पश्चिम आशिया, लवकरात लवकर संघर्ष संपवून शांतता प्रस्थापित करण्याच्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांचे समर्थन आम्ही करत असून पुढेही करत राहू.
आमचे या विषयावरही एकमत झाले आहे की, वाढणाऱ्या जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही स्वरुपाच्या दहशतवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आमची एकत्रित वचनबद्धता आहे.
महामहीम,
आर्क्टिक ते बाह्य अंतराळापर्यंत, हरित नौवहनापासून ते नील अर्थव्यवस्थेपर्यंत, ऊर्जा सुरक्षे पासून ते अन्न सुरक्षे पर्यंत आमची भागीदारी नव्या दिशांना स्पर्श करत आहे. या, आपण आपल्या हरित धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून विश्वसनीय, भविष्य वेधी आणि दीर्घकाळ चालणाऱ्या भागीदारीचा नवा अध्याय लिहूया.
आपले खूप खूप आभार
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
\Addressing the joint press meet with PM Jonas Gahr Støre of Norway.@jonasgahrstore https://t.co/gSOQw8Ismc
— Narendra Modi (@narendramodi) May 18, 2026
मैं पिछले वर्ष नॉर्वे आने वाला था, लेकिन पहलगाम में हुए आतंकी हमले के कारण वह यात्रा स्थगित करनी पड़ी।
— PMO India (@PMOIndia) May 18, 2026
उस कठिन समय में Norway ने आतंकवाद के विरुद्ध भारत के साथ मजबूती से खड़े होकर सच्ची मित्रता का परिचय दिया।
आज जब मैं Norway आया हूँ, तो मैं उस solidarity के लिए हृदय से आभार…
पिछले वर्ष, भारत और यूरोपियन फ्री ट्रैड एसोसिएशन ने, एक ऐतिहासिक trade and economic partnership agreement लागू किया।
— PMO India (@PMOIndia) May 18, 2026
यह अग्रीमन्ट भारत और नॉर्वे के बीच, shared progress और prosperity सुनिश्चित करने का blueprint है: PM @narendramodi
हमे बहुत खुशी है कि नॉर्वे आज, Indo-Pacific oceans initiative से जुड़ रहा है।
— PMO India (@PMOIndia) May 18, 2026
दो बड़े maritime देश होने के नाते, हम साथ मिलकर marine economy, maritime security और capacity building में सहयोग को मजबूत करेंगे: PM @narendramodi
भारत और नॉर्वे, दोनों, rules based order, dialogue और diplomacy में विश्वास रखते हैं।
— PMO India (@PMOIndia) May 18, 2026
हम एकमत हैं कि, केवल military conflict से किसी भी मुद्दे का समाधान नहीं निकल सकता।
यूक्रेन हो या पश्चिमी एशिया, हम संघर्ष की शीघ्र समाप्ति और शांति के हर प्रयास का समर्थन करते रहेंगे: PM…
हम इस बात पर भी एकमत हैं कि बढ़ते हुए global challenges के समाधान के लिए Global institutions का reform अनिवार्य है।
— PMO India (@PMOIndia) May 18, 2026
और terrorism के हर रूप को जड़ से समाप्त करना हमारी साझी प्रतिबद्धता है: PM @narendramodi