Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी इटलीच्या राष्ट्रपतींची घेतली भेट


नवी दिल्ली,20 मे 2026

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज रोममधील क्विरिनाले येथील राष्ट्रपती भवनात इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतली.

भारत-इटली संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि नेतृत्वाबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती मॅटारेला यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी भारत-इटली सामरिक सहयोगाच्या वाढत्या प्रगतीची नोंद घेतली आणि व्यापार-  गुंतवणूक, विज्ञान- तंत्रज्ञान, संशोधन – नवोपक्रम, संरक्षण -सुरक्षा, अवकाश, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील संबंध या क्षेत्रांत सुरू असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.त्यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरही विचारांची देवाणघेवाण केली.

भारत-युरोपिय महासंघ  मुक्त व्यापार करारावर लवकर स्वाक्षरीमुळे भागीदारीला नवी गती मिळेल, असे दोन्ही नेत्यांनी यावेळी नमूद केले. सागरी सुरक्षा, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी  भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरच्या (आयएमईसी) बहुविध महत्त्वावर त्यांनी चर्चा केली.

दोन्ही नेत्यांनी जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा केली आणि पश्चिम आशिया आणि युरोपमधील संघर्षांवर विचारांची देवाणघेवाण केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन, नौवहनाचे स्वातंत्र्य आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण याप्रती असलेल्या आपल्या सामायिक वचनबद्धतेचाही  पुनरुच्चार केला.

राष्ट्रपती मॅटारेला यांनी केलेल्या स्नेहपूर्ण आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि परस्परांना सोयीच्या   वेळी भारताला भेट देण्याचे  त्यांना निमंत्रण दिले.

निलीमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai