Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी एनटीआर गारू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली


नवी दिल्‍ली, 28 मे 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनटीआर गारू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले की, एनटीआर गारू यांचे स्मरण त्यांच्या लोककल्याण आणि सुशासना बद्दल असलेल्या कटिबद्धतेमुळे अत्यंत आदराने केले जाते,  त्यांच्या याच कटिबद्धतेमुळेच गरीब आणि वंचित घटकांना सन्मान प्राप्त झाला.

पंतप्रधानांनी असेही म्हटले की, एनटीआर गारू यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान आजच्या पिढीतील लोकांनाही भुरळ घालत असून त्यांचे जीवन व आदर्श हे आजही असीम प्रेरणेचा स्रोत आहेत.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

महान एनटीआर गारू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. त्यांच्या लोककल्याण आणि सुशासनाबद्दल असलेल्या कटिबद्धतेमुळे त्यांचे स्मरण अत्यंत आदराने केले जाते, त्यांच्या या कटिबद्धतेमुळेच गरीब आणि वंचित घटकांना सन्मान प्राप्त झाला.

चित्रपट क्षेत्रातील त्यांचे योगदान आजच्या पिढीतील लोकांना भुरळ घालत आहे. त्यांचे जीवन आणि आदर्श हे आजही असीम प्रेरणेचा स्रोत आहेत. माझे मित्र चंद्राबाबू नायडू गारू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेशातील एनडीए सरकार, एनटीआर गारू यांनी जनतेसाठी पाहिलेली स्वप्ने पुढे नेण्यासाठी  कटिबद्ध आहे.

 

 

* * *

हर्षल आकुडे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai