Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्‍ली, 1 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या जाण्याने अत्यंत दुःख झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुमन कल्याणपूर यांच्या सुमधुर आवाजाने आणि भावपूर्ण गायकीने भारताचे सांस्कृतिक क्षेत्र अधिक समृद्ध केले, तसेच आपल्या गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी संगीतप्रेमी आणि भारतीय चित्रपटाच्या चाहत्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.

‘एक्स’  या समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणतात,

“लोकप्रिय गायिका सुमन कल्याणपूर जी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांच्या सुमधुर आवाजाने आणि भावपूर्ण गायकीने आपल्या सांस्कृतिक क्षेत्राला समृद्ध केले. त्यांनी आपल्या गाण्यांमधून संगीतप्रेमी आणि भारतीय चित्रपटाच्या चाहत्यांच्या मनात एक हक्काचे व विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai