Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कशा प्रकारे उद्योगांना औपचारिक रूप देत आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे ते अधोरेखित करणारा केंद्रीय मंत्र्यांचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्ली,21 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

भारतातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्र तळागाळातील उद्योजकतेला, विशेषतः महिलांना मोठे बळ देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) परवडणारा वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, ब्रँडिंग आणि बाजारपेठ जोडणीद्वारे उद्योगांना कशा प्रकारे औपचारिक रूप देत आहे, तसेच स्थानिक उत्पादकांना नोकरी देणारे बनवून, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करून आत्मनिर्भर भारत उभारण्यासाठी कशा प्रकारे मदत करत आहे, ते या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

“भारतातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्र तळागाळातील उद्योजकतेला, विशेषतः महिलांना मोठे बळ देत आहे. केंद्रीय मंत्री @iChiragPaswan यांनी अधोरेखित केले आहे की,पीएमएफएमई योजना ही परवडणारा वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, ब्रँडिंग आणि बाजाराशी जोडणी याद्वारे उद्योगांना कशा प्रकारे औपचारिक रूप देत आहे. तसेच स्थानिक उत्पादकांना नोकरी प्रदाते बनण्यासाठी, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि  ‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्यासाठी सक्षम करत आहे.”

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर