Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी निःस्वार्थ सेवा आणि समर्पण भावना अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


 

आपल्या क्षमतांचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी कसा करता येईल हे सातत्याने वाहणारा नदीचा प्रवाह आपल्याला शिकवतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. निःस्वार्थ सेवा, समर्पण आणि परोपकारी वृत्ती राष्ट्राला एक नवीन दिशा देते, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी यासंदर्भात एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.   

“जीवनं स्वं परार्थाय नित्यं यच्छत मानवाः।

इति सन्देशमाख्यातुं समुद्रं यान्ति निम्नगाः॥”

मानवाने आपले जीवन इतरांची सेवा आणि कल्याणासाठी समर्पित करायला हवे असे या सुभाषितात म्हटले आहे. ज्याप्रमाणे नद्या अव्याहतपणे आणि निःस्वार्थपणे सदैव वाहत अगणित जीवांचे पोषण करतात आणि अंतिमतः सागरामध्ये विलीन होतात त्याचप्रमाणे आपण देखील आपला वेळ, क्षमता आणि संसाधनांचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी करायला हवा. मानवी जीवनाचे खरे उद्दिष्ट आणि पूर्तता ही निःस्वार्थ सेवा आणि सर्वांच्या कल्याणामध्येच आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील संदेशात लिहिले आहे:

नद्यांचा अखंड प्रवाह आपल्याला मानवतेच्या भल्यासाठी आपल्या क्षमतेचा उपयोग कसा करावा हे शिकवतो. निस्वार्थ सेवा, समर्पण आणि परोपकाराची ही भावना देशाला एक नवी दिशा देते.

जीवनं स्वं परार्थाय नित्यं यच्छत मानवाः।

इति सन्देशमाख्यातुं समुद्रं यान्ति निम्नगाः॥”

*** 

नितीन फुल्लुके / भक्ती सोनटक्के/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai