Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 2 सप्टेंबर रोजी जलसुरक्षा विषयावरील विभागीय शिखर परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होणार


नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन इथे होणाऱ्या जल शक्ती मंत्रालयाच्या विभागीय शिखर परिषदेच्या समारोपाच्या सत्रात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करतील.

1 व 2 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित ही दोन दिवसांची विभागीय परिषद विभागीय परिषदांच्या मालिकेतील पहिली परिषद आहे. भारतीयत्व व सहकारी संघराज्याची भावना बळकट करण्याच्या आणि केंद्र व राज्य सरकारांच्या निकटच्या सहकार्याच्या माध्यमातून राष्ट्रीय प्राधान्याच्या एकत्रित जबाबदारीला चालना देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातून या विभागीय शिखर परिषदांची संकल्पना साकारली आहे. प्रमुख विभागीय प्राधान्यक्रमांबाबत संयुक्तरित्या चर्चा करुन अंमलबजावणीला गती देण्यासाठी तसेच चांगल्या परिणामांसाठी एक रचनात्मक मंच या उपक्रमामुळे उपलब्ध झाला आहे.

या परिषदेत राजकीय नेते आणि केंद्र व राज्य सरकारांचे वरीष्ठ अधिकारी प्रमुख प्राधान्यक्रमांविषयी चर्चा करतील, उत्कृष्ट अनुभवांचे आदानप्रदान करतील, अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर बोलतील आणि कालबद्ध कृती आराखडा विकसित करतील. राष्ट्राच्या उद्दीष्टांसाठी सामायिक जबाबदारीला प्रोत्साहन देणे आणि चर्चेचे रुपांतर प्रशासकीय व सेवा कामकाजात सुधारणा होण्याची हमी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  

या शिखर परिषदेत भर दिला जाणारी चार प्रमुख क्षेत्रे

  1. जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेत अंमल बजावणी
  2. जल संचय जन भागीदारी – पावसाच्या पाण्याचा संचय
  3. पेय जल स्रोतांची शाश्वतता
  4. जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत ग्रामीण पेयजल पुरवठा यंत्रणांची देखभाल व कामकाज

या विचारविनिमयामधून जल पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती, जलसंवर्धनामध्ये नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन, शाश्वत पेयजल स्रोतांची हमी आणि ग्रामीण पेयजल यंत्रणांच्या विश्वासार्हता व उत्तरदायित्वामधे सुधारणा यासाठी ठोस, कालबद्ध कृती होणे अपेक्षित आहे.   

 

* * *

सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai