पीएम्इंडिया
ब्रिक्सच्या दोन दशकांच्या वाटचालीच्या निमित्ताने, 12 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत झालेल्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर या द्विदशक पूर्ततेची आठवण जपणाऱ्या दोन टपाल तिकिटांचे प्रकाशन करण्यात आले.
ब्रिक्स : सहकार्याची दोन दशके, 2006 ते 2026 असा मजकूर असलेले ही स्मरण टपाल तिकीटे, संवाद आणि सहकार्यासाठी ब्रिक्स हे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून पुढे आल्याचे दिसून येते.
ही दोन्ही टपाल तिकिटे भारताच्या 2026 मधील ब्रिक्स अध्यक्षपदाच्या प्राधान्यक्रमांवर आधारित आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यावर्षीची संकल्पना आहे.
पहिल्या टपाल तिकिटातून परस्पर आदर, समजूतदारपणा आणि एकजुटीच्या भावनेतून ब्रिक्स एक व्यासपीठ म्हणून पुढे आल्याचे दिसून येते, तर दुसऱ्या टपाल तिकिटावर ब्रिक्सचे चिन्ह असून, भारताच्या अध्यक्षपदामागील मानवता प्रथम आणि लोककेंद्रित दृष्टिकोन मांडण्यात आला आहे.
***
शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai