पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात 4-1 अशा दमदार विजयासह विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी या कामगिरीचे वर्णन ‘उल्लेखनीय’ असे केले आणि ही कामगिरी युवा खेळाडूंची प्रचंड गुणवत्ता दर्शवणारी असल्याचे म्हटले.
मोदी यांनी संपूर्ण संघाला शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले की,
अंतिम सामन्यात 4-1 अशा दमदार विजयासह आशिया चषक जिंकल्याबद्दल आमच्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. ही खरोखरच एक उल्लेखनीय कामगिरी आहे.
ही कामगिरी आमच्या युवा खेळाडूंची प्रचंड गुणवत्ता दर्शवते. संपूर्ण संघाला खूप खूप शुभेच्छा!
Congratulations to our Junior Men’s Hockey Team on winning the Asia Cup with an emphatic 4-1 win in the final. It is indeed a remarkable achievement.
This feat reflects the immense talent of our young players. Best wishes to the entire team!
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2026
***
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]