Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाचे आशिया चषक राखल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन


भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने आशिया चषकाचे विजेतेपद राखत संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याची कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.

संघाच्या या यशातून खेळाडूंची प्रतिभा आणि त्यांच्या दृढनिश्चयाची प्रचिती येते असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भारतीय संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश, 

भारतीय हॉकीसाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण!
आपल्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने अपराजित रहात आशिया चषक राखल्याबद्दल संघाचे अभिनंदन.

त्यांच्या या यशातून खेळाडूंची प्रतिभा आणि त्यांच्या दृढनिश्चयाची प्रचिती येते.

संपूर्ण संघाला शुभेच्छा!
@TheHockeyIndia

***

राधिका अघोर/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]