Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली


नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात बंगाली लेखक शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. या महान लेखकाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी चटोपाध्याय यांच्या प्रत्येक भारतीय भाषेत आणि अनेक परदेशी भाषांमध्ये अनुवादित साहित्यकृतींचे आजही अबाधित राहिलेले महत्त्व अधोरेखित केले. शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचे लेखन 19व्या शतकातील भारताचे, विशेषतः ग्रामीण भागातील बंगाली समाजाचे अचूक आणि संवेदनशील चित्रण पहायला मिळते, असेही पंतप्रधान म्हणाले 

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे:

“प्रख्यात बंगाली लेखक, बहुआयामी प्रतिभावंत शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदरांजली !

त्यांच्या साहित्यकृतींचे जवळपास प्रत्येक भारतीय भाषेत आणि अनेक परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. 19व्या शतकातील भारताच्या, विशेषतः ग्रामीण भागातील बंगाली समाजाच्या अचूक चित्रणासाठी त्यांच्या साहित्यकृती कायम स्मरणात आहेत.सामाजिक सुधारणा, महिलांचे हक्क आणि राष्ट्रवाद यांप्रति असलेली त्यांची बांधिलकीही तितकीच उल्लेखनीय होती.येणाऱ्या काळात अधिकाधिक तरुणांनी त्यांचे लेखन वाचावे,असे आवाहन करतो.”

 

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai