Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विखुरलेल्या जगात सर्वांना सोबत घेऊन आघाडी उभारण्याचा भारताचा दृष्टिकोन अधोरेखित करणारा लेख पंतप्रधानांनी सामायिक केला


नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आरपीजी एंटरप्रायझेस’चे अध्यक्ष हर्ष गोएंका यांचा एक लेख सामायिक केला आहे. या लेखात, आजच्या विभाजित जगात, पंतप्रधानांचा परराष्ट्र धोरणाचा दृष्टिकोन, विविध आघाड्या  उभारण्यावर कसा केंद्रित आहे ; तसेच प्रतिस्पर्धी शक्तींबरोबर असलेल्या संबंधांमध्ये समतोल राखणे आणि भारताचे  धोरणात्मक हितसंबंधही पुढे नेण्यावरही भर दिला आहे. मोदी यांनी नमूद केले की, हा लेख ब्रिक्स  शिखर परिषदेत स्वीकारलेला ‘नवी दिल्ली जाहीरनामा’ हा भारताच्या आघाडी उभारण्याच्या दृष्टिकोनाचे उदाहरण असल्याचे अधोरेखित करतो.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर पोस्ट केले:

“’आरपीजी एंटरप्रायझेस’चे अध्यक्ष @hvgoenka लिहितात की, पंतप्रधान @narendramodi यांचा परराष्ट्र धोरणाचा दृष्टिकोन हा विखुरलेल्या जगात आघाड्या उभारण्यावर, प्रतिस्पर्धी शक्तींबरोबर संबंधांमध्ये समतोल राखण्यावर आणि त्याच वेळी भारताची धोरणात्मक हितसंबंधे पुढे नेण्यावर केंद्रित आहे.

ब्रिक्स शिखर परिषदेत स्वीकारलेला नवी दिल्ली जाहीरनामा भारताच्या आघाडी उभारण्याच्या दृष्टिकोनाचे उदाहरण म्हणून अधोरेखित केला आहे.”

राधिका अघोर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai