पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार पायल मेहता यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी म्हटले आहे की, पायल मेहता या वास्तवाचे भान असलेल्या कर्तव्यनिष्ठ आणि समर्पित पत्रकार होत्या. त्यांनी आपल्या वार्तांकनातून राष्ट्रीय मुद्द्यांची सखोल समज समोर आणली. “त्यांच्यातील आपुलकी, दयाळूपणा आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांसाठी त्या नेहमी लक्षात राहतील.”, असे मोदी यांनी नमूद केले
मोदी यांनी X वर केलेल्या संदेशात म्हटले:
पायल मेहता या एक कर्तव्यनिष्ठ पत्रकार होत्या ज्या जमिनीशी घट्ट जोडलेल्या राहिल्या आणि त्यांनी आपल्या वार्तांकनातून राष्ट्रीय मुद्द्यांची सखोल समज समोर आणली.
त्यांच्या कामाच्या पलीकडे, त्यांनी आपल्या प्रेमळ आणि आपुलकीच्या स्वभावाने अनेक लोकांच्या जीवनाला स्पर्श केला, त्यासाठी त्या नेहमी लक्षात राहतील. त्यांचे अचानक आणि अकाली जाणे अत्यंत दुःखद आहे.
माझ्या संवेदना त्यांचे कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांसोबत आहेत. या कठीण काळात त्यांना शक्ती मिळो. ओम शांती.
Payal Mehta Ji was a hardworking journalist who remained firmly connected to the ground, bringing a deep understanding of national issues to her reporting.
Beyond her work, she will be remembered for the kindness and warmth with which she touched so many lives. Her sudden and untimely passing is extremely saddening.
My condolences to her family, friends and colleagues. May they find strength in this difficult hour. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2026
***
नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
Payal Mehta Ji was a hardworking journalist who remained firmly connected to the ground, bringing a deep understanding of national issues to her reporting.
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2026
Beyond her work, she will be remembered for the kindness and warmth with which she touched so many lives. Her sudden and… pic.twitter.com/4uG7MmzGol