Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला पोल वॉल्ट प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारानिका इलांगोवन यांचे केले अभिनंदन


 

आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या पदार्पणातच महिलांच्या पोल वॉल्ट क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बारानिका इलांगोवन यांचे अभिनंदन केले. ही एक खास झेप असून भारतासाठीचे आदर्श पदक असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

हे अभिमानास्पद यश असून, यामुळे अनेक युवा खेळाडूंना हा खेळ खेळण्याची प्रेरणा मिळेल, असेही प्रंतप्रधानांनी म्हटले आहे.

यासंदर्भात  X या समाज माध्यमावर पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केलेला संदेश :

एक खास झेप आणि भारतासाठीचे आदर्श पदक!

आपल्या पदार्पणाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पोल वॉल्ट प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल बारानिका इलांगोवन यांचे अभिनंदन. ही एक अभिमानास्पद कामगिरी असून, यामुळे अनेक युवा खेळाडूंना हा खेळ खेळण्याची प्रेरणा मिळेल : पंतप्रधान @narendramodi

***

निलिमा चितळे/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]