पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरिता भद्रा हिचे अभिनंदन केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदार्पणात हरिता भद्राने आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाने शर्यत पूर्ण करत मानाचे स्थान मिळवल्याचे पंतप्रधान म्हणाले. या शानदार कामगिरीबद्दल त्यांनी हरिताचे अभिनंदन केले आणि तिच्या या कामगिरीचा भारताला अभिमान असल्याचे नमूद केले.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्रा हिने शानदार कांस्यपदक पटकावले आहे! या स्पर्धेतील पदार्पणात तिने आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाने शर्यत पूर्ण करत पदकविजेत्यांच्या व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवले. या शानदार कामगिरीबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन. भारताला तिचा अभिमान आहे: PM @narendramodi”
A fantastic Bronze for Harita Bhadra in the Women’s 200m at the Asian Games! Making her Asian Games debut, she raced with confidence and determination to secure a well-deserved place on the podium. Congratulations to her on this wonderful achievement. India is proud of her: PM… pic.twitter.com/7X7Hm3bRIA
— PMO India (@PMOIndia) September 27, 2026
* * *
सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai