पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
आशियायी क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश या क्रीडा प्रकारात महिला एकेरीत रौप्यपदक विजेती दमदार कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनाहत सिंग हिचे अभिनंदन केले. अनाहतची कामगिरी खूपच प्रभावशाली होती असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
विशेषतः दिग्गज खेळाडूंविरुद्ध खेळताना अनाहत हीने उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. अनाहत हिने अशाच तऱ्हेने यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करावीत आणि भारतासाठी आणखी बहुमान मिळवून द्यावा, अशी सदिच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात X या समाजमाध्यमावर पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केलेला संदेश:
“@Anahat_Singh13 हीची रौप्यपदक विजेती दमदार कामगिरी ! आशियायी क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश या प्रकारात महिला एकेरीतील तिची कामगिरी अत्यंत प्रभावशाली होती. विशेषतः सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळताना तिने अफाट कौशल्य दाखवले. ती यशाची अशीच नवनवी शिखरे सर करत राहो आणि भारताला आणखी बहुमान मिळवून देवो हीच सदिच्छा : PM @narendramodi”
A splendid Silver for @Anahat_Singh13! Her performance in the Women’s Singles Squash at the Asian Games has been impressive. She has shown tremendous skill, notably while competing against some of the finest players. May she continue to scale new heights and bring many more… pic.twitter.com/kFDiVCQenT
— PMO India (@PMOIndia) September 27, 2026
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai